abuse of minor girl jalgaon crime
abuse of minor girl jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; बालिका गर्भवती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील चौदा वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे. या अमानुष व अमानवी घटनेमुळे शहराच्या नैतिकतेला व वैभवाला काळिमा फासला गेला आहे. (group abuse of minor girl jalgaon crime)

या प्रकरणी पीडित मुलीच्या वृद्ध आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शहरातीलच सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी २७ एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते.

पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती २८ एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते. तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेने संशयित सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.

घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या ६५ वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली.

त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT