Gulabrao patil esakal
जळगाव

खासदारांच्या गद्दारीची परतफेड करू : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : खासदार उन्मेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी उशिरा मिळाली असतानाही शिवसेनेचे (Shiv sena) सर्वार्थाने बळ दाखवून त्यांना विजयी केले. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले. मात्र, त्याची कदर न बाळगता खासदारांनी गद्दारी केली. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आले नाहीत व नंतरही सातत्याने शिवसेनाविरोधी भूमिका घेत आहेत. खासदारांच्या या गद्दारीची येणाऱ्या निवडणुकीत परतफेड करू, असा सेना स्टाईल इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला. (Guardian Minister Gulabrao Patil Statement against MLA unmesh patil Jalgaon News)

येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क परमुख संजय सावंत, महानगरप्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्शल माने, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील पाटील, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, विराज तावडे, सुमीत पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ॲड. अभय पाटील, जितेंद्र जैन, तालुकाप्रमुख शरद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, दीपक पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, गणेश पाटील, जावेद शेख, प्रवीण ब्राह्मणे, मतीन बागवान, आयुष बागवान, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, शिवदास पाटील, रवी गिते, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की सध्या काही स्वार्थी राजकारणी राम व हनुमानाच्या नावे नारे लावून शिवसेनेला बदनाम करीत आहेत. तसा ठेका अनेकांनी घेतला असून, बाळासाहेबांची शाल पांघरली, म्हणून आपण बाळासाहेब झालो, असे कोणी समजू नये, यांचे भोंगे कधीच बंद झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेने समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या विकासात्मक कामांचा, राबविलेल्या ध्येयधोरणांचा आढावा घेतला. आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या असून त्यासाठी जिद्दीने कामाला लागून शिवसेनेची एक हाती सत्ता प्रस्थापित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार किशोर पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली. गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सावंत, विष्णू भंगाळे यांची भाषणे झाली. दरम्यान, युवासेनेतर्फे महालपुरे कार्यालयापासून दुचाकीरॅली काढण्यात आली. महाराणा प्रताप चौकात रॅलीचा समारोप झाला.

भाजपकडून आमदार पाटलांचा निषेध

शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना ‘बोबडा’ संबोधून त्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली असून, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा निषेध करून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दिव्यांग, अपंग व शारीरिक व्यंगावर टीका करणे हे अमानवी व निषेधार्थ असून, केवळ प्रसिद्धीसाठी व पक्षश्रेष्ठींच्या नजरेत स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी हा बालिशपणा केला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT