Guardian Minister Gulabrao Patil worshiping the statue of Shiv Sena chief Balasaheb Thackeray esakal
जळगाव

Jalgaon News : बाळासाहेबांचे विचार विकास, संस्काराची शिदोरी : पालकमंत्री पाटील

शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे विकास व संस्काराची शिदोरी आहे. याच विचाराने प्रेरित होऊन राज्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू व मराठी जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडला. त्यांनी दिलेला विचार प्रमाण मानून बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार समाजकारणाचा वसा जोपासत आहोत.

शिवसेना प्रमुखांचे विचार म्हणजे विकास व संस्काराची शिदोरी आहे. (Guardian Minister Gulabrao Patil statement of Balasaheb thoughts and development foundation of culture)

याच विचाराने प्रेरित होऊन राज्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.२३) पाळधी बुद्रूक येथे ग्रामपंचायत चौकात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

पालकमंत्री पाटील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार हे चिरंतन आहेत. पक्ष, संघटना, माणसे येत जात असतात. पण विचार कायम राहतात. विचार कधी मरत नाहीत.

सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत बाळासाहेबांचे विचार अबाधित राहणार आहेत. त्यांच्या विचारांना प्रमाण मानून आजवर वाटचाल केली आहे.

राज्यात ग्रामीण भागातून शिवसेनेच्या मेळाव्यात बोलण्याची संधी बाळासाहेबांमुळेच सर्वप्रथम मिळाली असून हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.

तालुका प्रमुख डी ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, पाळधी बुद्रूकचे सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, सरपंच दत्तू पाटील, नवल पारधी, निसार देशमुख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT