Guardian Minister Gulabrao Patil while reading the Constitution Preamble on Sunday on the occasion of Constitution Day. Respected neighbors. esakal
जळगाव

Gulabrao Patil News: सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान अस्तित्वात राहील : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान अस्तित्वात राहील. संविधानाला हात लावण्याचा किंवा ते बदलून टाकण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी तो प्रयत्न भारतीय जनता हाणून पाडेल. सामान्यातल्या सामान्य जातीतल्या माणसाला राज्याचा मंत्री होता येते. (Guardian Minister Gulabrao Patil statement of Indian constitution will exist as long as there is sun moon and stars jalgaon news)

याचे सारे श्रेय भारतीय संविधानाला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. त्यांच्याप्रति आम्ही सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणेही महत्त्वाचे आहे, असे विचार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. २६) येथे मांडले.

संविधान जागर समितीतर्फे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. संविधान जागर समितीचे अध्यक्ष आयोजक मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

ते म्हणाले, की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भौगोलिक दृष्टीचाही विचार करीत देशाला व भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयाचा जीवन जगण्याचा सन्मार्ग आहे.

संविधान गौरव दिनानिमित्ताची भूमिका सपकाळे यांनी विशद केली. संविधानावर होणारे धर्मांधतेचे हल्ले, जातीजातींत व धर्माधर्मांत तेढ निर्माण करणारे विचार हे संविधानाला अडचणीत आणत आहेत. यासाठी भारतीय जनतेने जागरूक राहण्याची गरज आहे.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, सत्यशोधक समाजाचे विचारवंत जयसिंग वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, मुस्लिम धर्माचे मुक्ती हारून यांनी मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, दिलीप सपकाळे, फारुख शेख, अमोल कोल्हे, ॲड. राजेश झाल्टे, सरिता माळी, संदीप ढंढोरे, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, वाल्मीक जाधव, विनोद रंधे, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, वाल्मीक सपकाळे, सतीश सूर्यवंशी, भारती बाविस्कर, माजी नगरसेवक राजू मोरे, श्रीकांत बाविस्कर, अशोक लाडवंजारी, नीलू इंगळे आदी उपस्थित होते.

संविधान सभेनंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संविधान गौरव रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, जुने बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. डॉ. मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले. हरिश्चंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. बापूराव पानपाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

India's T20 WC 2026 Schedule : संघ जाहीर झाला आता भारताचं वेळापत्रक नोट करा! पहिला सामना अमेरिकेशी नंतर पाकिस्तानशी भिडणार...

Latest Marathi News Live Update: मुंबई पालिकेतील मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पुन्हा चिघळला!

Dhule News : धुळे राष्ट्रवादीचे जहाज 'विना कॅप्टन'; शहराध्यक्षाविना निवडणुकीच्या रिंगणात कशी टिकणार फौज?

Jaysingpur Farmer : ऊसपट्ट्यातच चाऱ्याचा दुष्काळ; शिरोळमध्ये वाड्यासाठी शेकड्याला २०० रुपये

SCROLL FOR NEXT