gulabrao patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर कारवाई : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतकरी अगोदरच अवकाळी पावसाने बेजार झाला आहे. त्याला खरीपासाठी वेळेवर कर्ज बँकांनी द्यावे.

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ बँकांनी मागितला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. १२) येथे दिला. (Guardian Minister Patil statement about Action against banks asking for CIBIL score for crop loans jalgaon news)

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. तीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आमदार एकनाथराव खडसे, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरिपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे मिळावे. खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे.

पावसाच्या अंदाजाची माहिती पुरवा

शेतकऱ्यांनी १ जूननंतरच पेरणी करावी. खरीप हंगाम तोंडावर असताना, बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, पावसाचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पावसाचे अंदाज शेतकऱ्यांना वेळोवेळी कळत राहिले, तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल, असेही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्री पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन, रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पीकविमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्तीसह विविध योजनांचा आढावा जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत घेतला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे आमदार पाटील, आमदार खडसे यांनी सूचित केले.

२० कोटींची भरपाई

मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळीचा जळगाव जिल्ह्यातील १८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने २० कोटी ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

आकडे बोलतात...

एकूण वहितीखालील क्षेत्र-८ लाख ४८ हजार हेक्टर

खरीप क्षेत्र-७ लाख ७० हजार

कापसाचे प्रस्तावित क्षेत्र-५ लाख ५० हजार

इतर क्षेत्र-२ लाख १३ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! झेडपी, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमुळे लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; महिलांना ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार

Diwali Breakfast Recipe: दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुलांसाठी बनवा रागी पराठा बाइट, सोपी आहे रेसिपी

Panchang 22 October 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 ऑक्टोबर 2025

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक, ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात; महिलांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT