Gulabrao Patil  Esakal
जळगाव

Gulabrao Patil : शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठीच गद्दारी केली

आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Gulabrao Patil : बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख मविआ नेत्यांकडून गद्दार असा केला जात आहे. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

या टीकेवरून अनेकदा शिंदे गट आणि मविआ नेत्यांमध्ये वादाचे प्रसंगदेखील पाहण्यास मिळाले आहेत. मात्र, आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टिकेला उत्तर दिले आहे.

गुलाबराव म्हणाले की, मी गद्दार झालो नाही तर, एक मराठ चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच मी गद्दारी केली असे स्पष्ट उत्तर गुलाबराव पाटील यांनी टीका करणाऱ्यांना दिले आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते.

"तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला असे म्हणत एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT