gulabrao patil
gulabrao patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : जिल्ह्यात 75 हजार जणांना ‘शासकीय जत्रे’चा लाभ देणार : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील ७५ हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता. १) येथे केले. (gulabrao patil statement about 75 thousand eligible beneficiaries will be given benefit of government schemes jalgaon news)

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

पालकमंत्री म्हणाले, की मार्च महिन्यात अवकाळीचा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने २० कोटी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. सप्टेंबर व नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी २७ कोटी ७६ लाख रुपये, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची ६६ कोटी १४ लाख रुपये, तर मालमत्तेच्या नुकसानीची ६६ कोटी १४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना ३३ कोटी ६१ लाख रुपयांची, तर २०२१-२२ अंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत ५० हजार १९१ शेतकऱ्यांना ४१९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच हजार ४४५ लाभार्थ्यांना ३१ कोटी २४ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

चार वाळू घाटांचा दोन डेपोतून लिलाव

राज्य शासनाने वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्रीचे सर्वंकष धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यातून राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील आठ वाळू घाटांना पर्यावरण मान्यता प्राप्त असून, त्यापैकी चार वाळू घाट शासकीय कामांसाठी राखून ठेवले आहेत. उर्वरित चार वाळू घाटांमधील वाळू दोन डेपोच्या माध्यमातून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाचशे कोटींचा निधी

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून जिल्ह्यात मूलभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. या वर्षी ९९.६ टक्के निधी खर्च झाला आहे.

संभाव्य टंचाई कृतिआराखडा तयार

जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी दोन कोटी ४४ लाख रुपयांचा संभाव्य टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर जुलै ते ऑगस्टदरम्यान ५५६ गावांसाठी तीन कोटी ४२ लाख रुपयांचा विशेष टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.

दहा लाखांचे पारितोषिक

‘आपली पेन्शन आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबवून राज्यात प्रथम क्रमांकाचे दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले, त्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

गुणवंतांचा गौरव

उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल आदर्श तलाठी पुरस्काराने मनीष रत्नाणी (जामठी, ता. बोदवड) यांना गौरविण्यात आले.

सुधारक सन्मान पुरस्कार : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार- प्रकाश हरी नेमाडे (रा. मस्कावद, ता. रावेर), दत्तात्रय रमेश पाटील (रा. चहार्डी, ता. चोपडा), सुनील अंबादास भामरे (अमोदा, ता. यावल).

पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह : विनयकुमार भीमराव देसले, संजय हरिदास पवार, नरेंद्र हिरलाल कुमावत, सचिन सुभाष विसपुते, सुनील अर्जुन माळी, मनोज काशीनाथ जोशी, राजेश प्रभाकर चौधरी, सुनील माधव शिरसाट, विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सुरी, अमोल भरत विसपुते, रवींद्र धोंडू घुगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT