gulabrao patil
gulabrao patil esakal
जळगाव

Gulabrao Patil | बाजार समिती निवडणुका युतीतर्फेच लढणार : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यांच्यासोबत आपण कायम राहणार आहोत.

त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत (market committee election) आपली भाजपसोबत युती होईल. (Gulabrao Patil statement about market committee election bjp alliance jalgaon news)

मात्र, काही दुफळी करणारे कार्यकर्ते प्रत्येक वेळी ‘युती’ तोडण्याचाच प्रयत्न करतात. अशापासून भाजप आणि शिवसेनेही सावध राहावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख नीलेश पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता आम्ही त्यांच्याकडे पाहून भाजपसोबतच राहणार आहोत. केवळ बाजार समितीतच नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीतही युती कायम राहील. त्यामुळे बाजार समितीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. पुढे तुम्हाला संधी मिळणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आम्ही केवळ निवडणूक लढवायची म्हणून ‘युती’ करणार नाही, तर प्रत्येक उमेदवार विजयी व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेवढी ताकद शिवसेना लावेल, तेवढीच ताकद भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लावणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार यासाठी प्रयत्न करतील. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार नाहीत, तेथे जवळच्या तालुक्यातील आमदार लक्ष देतील.

आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समित्यांची निवडणूक भाजप-सेना युतीतर्फे लढविण्यात येईल. बाजार समिती निवडणुकीतील बारकावे, तसेच तांत्रिक बाबींचीही त्यांनी माहिती दिली. रिपाइं (आठवले गट) चे मुकुंद नन्नवरे यांनी आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT