Gurumauli Annasaheb More  esakal
जळगाव

Gurumauli Annasaheb More : देशवासीयांना सेवेकरी बनवा : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : मानव, समाज अन्‌ राष्ट्रहितासाठी समस्त देशवासीयांना सेवेकरी बनवा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले.

दिंडोरी प्रधान क्षेत्री गुरुवारी (ता. ५) साप्ताहिक प्रश्‍नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. या वेळी राज्यभरातून सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, की आज वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. (Gurumauli guidance Make citizen servant news)

या समस्या सोडवून मानवाला सन्मार्गाला लावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सेवामार्ग करीत आहे. सेवामार्गाचे १८ विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहेत. या १८ विभागांचे प्रतिनिधी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या प्रतिनिधींना अधिक प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी २१ ऑक्टोबरला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील गुरुपीठात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच, याच दिवशी वधू-वर परिचय मेळावाही होणार आहे.

उपवर मुला-मुलींप्रमाणेच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांनीही मेळाव्याचा अवश्‍य लाभ घ्यावा, असे गुरुमाउलींनी नमूद केले. पितृ पंधरवड्यानिमित्त पितरांच्या सेवेविषयी गुरुमाउलींनी मार्गदर्शन केले.

पितृपक्षात दक्षिणेकडे तोंड करून पितर तुष्टीकारक पितृस्तोत्र वाचावे, तसेच पितृतर्पण करावे आणि मृत व्यक्तीच्या तिथीला महालय श्राद्ध घालावे. ज्यांना मृताची तिथी माहीत नाही, त्यांनी सर्वपित्री अमावास्येला पितरांचे श्राद्ध घालावे.

आपल्या अमृततुल्य हितगुजात गुरुमाउलींनी मूल्यसंस्कार, प्रश्‍नोत्तरे, विवाह संस्कार, आयुर्वेद, पर्यावरण, कृषी, मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती, प्रशासकीय, कायदेशीर सल्लागार, देश-विदेश अभिमान या विभागांवरही मार्गदर्शन केले. नवीन सेवेकऱ्यांनी रोज ११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः अध्यायाचे वाचन करावे. शाकाहारी, निर्व्यसनी आणि सदाचारी राहून सेवामार्गाचा प्रचार- प्रसार करावा, अशी आचारसंहिता त्यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT