Married women Harassment esakal
जळगाव

Jalgaon : 50 हजारासाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : बांधकामासाठी (building material) लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, असे सांगून विवाहितेचा छळ (Married Women Harassment) केल्याप्रकरणी ओझर (ता. चाळीसगाव) येथील विवाहितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत पतीसह सासरच्यांविरूद्ध (In laws) गुन्हा दाखल झाला आहे. (harassment of married woman for Rs 50000 jalgaon crime News)

ओझर येथील २२ वर्षीय विवाहितेचा विवाह गावातील सचिन सुरेश जाधव याच्याशी २५ फेब्रुवारी २०१८ ला झाला. विवाहानंतर तीन महिने विवाहितेला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र बांधकामासाठी लागणाऱ्या प्लेट्स व इतर वस्तू खरेदीसाठी तिने तिच्या आईवडिलांकडून ५० हजार रुपये आणावेत, असा तगादा लावला. मागणी पूर्ण होत नसल्याने विवाहितेचा छळ करण्यास सुरवात केली. विवाहितेच्या आईवडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने तिने पैसे आणण्यास नकार दिला.

त्यावर लग्नात तिच्या आईवडिलांनी दिलेली पाच तोळे सोन्याची पोत व चांदीचे दागिणे अंगावरून काढून ४ सप्टेंबर २०२० ला रात्री दहाच्या सुमारास तिला सासरच्यांनी घराबाहेर काढले. त्यानंतर ती माहेरी आली असतानाही तिला सासरच्यांकडून त्रास त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे तिने जळगावच्या महिला दक्षता समितीकडे तक्रार केली. मात्र, त्या ठिकाणी सासरच्यांनी हजेरी लावली नाही. दक्षता समितीकडून मिळालेल्या पत्रानुसार, विवाहितेचा पती सचिन सुरेश जाधव, सासरे सुरेश सुखदेव जाधव, सासू संगीता सुरेश जाधव व दीर नितीन सुरेश जाधव यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. १) दुपारी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT