money returne esakal
जळगाव

Jalgaon News : ‘Phone Pe’वर आलेले 10 हजार केले परत; हरिश्चंद्र तावडे यांचा प्रामाणिकपणा!

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : अलीकडच्या स्वार्थी व स्वयंकेंद्री युगात माणुसकी व प्रामाणिकपणा लोप पावत असल्याचा आरोपात्मक सूर समाज मनातून व्यक्त होत असल्याचे आपण पाहतो. परंतु अजूनही समाजात प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याची प्रचिती देखील विविध घटनांवरून येते. (Harishchandra Tawde returned 10 thousand rupees received on phonepe to concerned person jalgaon news)

कळमसरा (ता. पाचोरा) येथील हरिश्चंद्र दत्तात्रय तावडे यांनी देखील आपला प्रामाणिकपणा कायम राखत ‘फोन पे’वर आलेले दहा हजार रुपये संबंधित व्यक्तीस परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

हरिश्चंद्र तावडे यांना ‘फोन पे’वर दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. कोणीही कोणत्याही कारणाने आपल्या ‘फोन पे’द्वारे पैसा पाठवणार नसल्याचे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी कोणाच्या ‘फोन पे’वरून ही रक्कम आली. त्याचा शोध घेतला व पैसे पाठवणाऱ्यांशी संपर्क केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कुणाल पवार (रा. टाकळी, ता. चाळीसगाव) यांनी पैसे पाठवल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांनी त्याबाबत विचारणा केली असता श्री. पवार यांना दुसऱ्या क्रमांकावर पैसे पाठवायचे होते परंतु मोबाईल क्रमांक डायल करताना एक क्रमांक चुकीचा डायल झाल्याने ते पैसे श्री. तावडे यांच्या मोबाईलवर जमा झाल्याचे स्पष्ट झाले. श्री. तावडे यांनी सदर व्यक्ती तीच असल्याची खात्री करून त्यांच्याच मोबाईल क्रमांकावर ‘फोन पे’द्वारे दहा हजार रुपये परत पाठवले. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : पक्षातून हकालपट्टी होताच ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT