Rain Damage Crop esakal
जळगाव

बळीराजा हवालदील! यंदाच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावणार

सकाळ डिजिटल टीम

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील आठही मंडळात ऑगस्टअखेर पिकांची चांगली स्थिती असताना सप्टेंबरमधील सततच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडातील खरिपाचा घास हिरावणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील पिकांची स्थिती चांगली असली तरी गणपती विसर्जनानंतर काही मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावायला सुरवात केली. यामुळे मात्र बागायती व इतर भागातील खरिपाला धोका निर्माण झाला आहे. मे-जून महिन्यात लागवड झालेल्या कपाशी, मका, सोयाबीन पिके आता भरात आलेली असताना अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

या वर्षी कापसाचा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी आनंदित असताना दुसरीकडे मात्र अतिपावसाने पिके धोक्यात येत आहेत. तालुक्यातील काही भागात कापूस वेचणीला सुरवात झाली असून, हातचे पीक खराब होत आहे. सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटू लागले आहेत. अतिनुकसान झालेल्या भागात त्वरित पंचनामे होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील पिकांची झालेली पेरणी

पिके प्रत्यक्ष लागवड क्षेत्र हेक्टर मध्ये

ज्वारी १३७०.००

बाजरी १२०१.००

मका ८६४०.००

तूर २६०.००

मूग १५४०.००

उडिद ८४५.००

भुईमूग ४६०.००

सोयाबीन १२४६.००

कापूस ४९७८०.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT