Rain esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : आज जोरदार पावसाचा अंदाज; जिल्ह्यात ढगाळ वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. २६) सकाळपासूनच ढगाळ, धुकेयुक्त वातावरण होते. सकाळपासूनच वातावरणात गारठा जाणवत असल्याने अनेकांनी स्वेटर, मफलर परिधान केले होते.

गारठ्यामुळे ज्येष्ठांना अंगदुखी, हातपाय दुखीचा त्रास सुरू झाला आहे. (Heavy rain forecast today in district jalgaon unseasonal rain news )

सायंकाळी भुसावळ व जळगावमध्ये मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पावसास सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू हेाती. दरम्यान, सोमवारी (ता. २७) जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान बेमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. रविवारी सकाळी काही मिनिटांपुरते सूर्यदर्शन झाले. नंतर दिवसभर ढगाळ वातावरण व हुडहुडी कायम राहिली.

रविवारी रात्री आठनंतर विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. ३० ते ४५ मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. सोमवारी सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

२८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT