Heavy rains  esakal
जळगाव

पारोळा तालुक्यात जोरदार पाऊस! अंजनी नदीला पूर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज दुपारी चारच्या सुमारास शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. टिटवी (ता. पारोळा) परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टिटवी तांडा रस्त्यावरील अंजनी नदीला पूर आला. ज्यामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीसह इतर पिकांची लागवड करता येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर सर्वसाधारणपणे ७ जूनला पाऊस सुरु होतो. यंदा मात्र, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. आज दुपारी चारपासून पावसाला सुरवात झाली. टिटवी (ता. पारोळा) परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने तांडा रस्त्यावरील अंजनी नदीला पूर आला होता. सायंकाळच्या सुमारास शाला सुटल्यानंतर पुरामुळे विद्यार्थ्यांसह पालकही घाबरले होते. युवा सेनेचे उपतालुका प्रमुख समाधान मगर यांच्यासह गावातील काही तरुण तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे नदीच्या पलीकडे सोडले. दरम्यान, टिटवीसह तांडा परिसरात तसेच जवळच्या शिरसमणी, चोरवड, हनुमंतखेडा आदी भागात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील इतरही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.

दरम्यान, शिरसमणी (ता. पारोळा) परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वीज तारा लोंबळकत आहेत. जमिनीपासून अवघ्या सहा ते सात फुटांवर या तारा आल्या असून त्या जीर्ण देखील झाल्या आहेत. सध्या पावसाळा असल्याने वीज तारा तुटण्याची भीती लक्षात घेता, त्या तातडीने उंच कराव्यात अशी मागणी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT