On the occasion of marriage, the newlyweds worshiping the images of national leaders and social reformers and bowing down. esakal
जळगाव

Jalgaon News: उच्चशिक्षितांकडून अक्षदा, मंगलाष्टकांना फाटा! प्रतिमापूजन, जिजाऊ वंदनेने बांधली लग्नगाठ

प्रा. सी. एन. चौधरी

Jalgaon News : अलीकडच्या गतिमान व धावपळीच्या युगात तीन ते चार दिवस चालणारा विवाह सोहळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. विवाह सोहळ्यांना अत्याधुनिकतेची जोड दिली जात असली तरी विवाह सोहळ्यांमधून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन व बडे जाव दाखविण्याची मनोवृत्ती मात्र कमालीची वाढताना दिसत आहे. (highly educated couple broke sterotypes Marriage knot tied with idol worship Jijau Vandane Jalgaon News)

विवाह सोहळ्याप्रसंगी मिरवणुकीचा गाजावाजा, वीज रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी यासह जेवणावळीवर कमालीचा खर्च केला जात असल्याचे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील.

परंतु येथील उच्चशिक्षित नवदाम्पत्याने मात्र अनेक पारंपरिक रितीरिवाज व प्रथांसह तांदळाच्या अक्षदा, मंगलाष्टके, मानपान आदी गोष्टींना फाटा देत केवळ राष्ट्रपुरुष व समाजसुधारकांच्या प्रतिमांचे पूजन व जिजाऊ वंदनेने आपली लग्नगाठ बांधली.

या विवाह सोहळ्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगत आहे. पाटील परिवाराच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुकही होत आहे. येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी माध्यमिक शिक्षक मंगेश पाटील यांची डिझायनर अभियंता असलेली कन्या वैष्णवी व महेंद्र पाटील यांचे सॉफ्टवेअर अभियंता पुत्र मंगेश पाटील यांचा शिवविवाह स्वप्नशिल्प रेसीडेन्सीत नुकताच झाला.

विवाह विधीचा प्रारंभ जगतगुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. वधू- वरांचे आई, वडील, मामा यांचा परिचय, कुळ, मामकुळ, मुळगाव मामांचे गाव असा परिचय करून देण्यात आला.

आपण बळीराजाची मुले आहोत व त्यामुळे जो शेतकरी वर्षभर शेतामध्ये काबाडकष्ट करतो, त्या अन्नाची नासाडी न करता कुठल्याही प्रकारच्या तांदळाच्या अक्षदा न टाकता फुलांच्या पाकळ्या अक्षदा म्हणून टाकत टाळ्या वाजून जिजाऊ वंदना म्हणत लग्नगाठ बांधण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वधू- वरास आशीर्वाद देण्यात आले. या विवाहात प्राचीन सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसून आल्या. वधू उजव्या बाजूस आणि वर डाव्या बाजूस उभे होते. याच बरोबर महिलांचा आधी सन्मान व्हावा म्हणून वराने आधी वधूच्या गळ्यात हार घातला. नंतर वधूने वराला हार घातला.

विवाहप्रसंगी उपस्थितांनाच जिवंत देव मानून वधू व वराने वैवाहिक जीवनाची प्रतिज्ञा केली. या विवाहाचे पौरोहित्य शिवसेवक राजेंद्र पाटील (गाळणकर) यांनी केले. या विवाह सोहळ्यास आमदार किशोर पाटील, भाजपचे अमोल शिंदे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी,

पीटीसी चेअरमन संजय वाघ, डी. एम. पाटील, ग. स. संचालक राम पवार व भाईदास पाटील, माध्यमिक पतपेढी संचालक भगतसिंग पाटील, प्रमोद पाटील, ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, पत्रकार संदीप महाजन,

शिवाजी शिंदे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या व आदर्श शिवविवाहाचे नियोजन सुमित पाटील व तेजस पाटील यांनी केले. या विवाह सोहळ्याचे व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT