Nasirabad Tolnaca
Nasirabad Tolnaca Nasirabad Tolnaca
जळगाव

चौपदरीकरण बाकी आणि नशिराबाद टोलनाका सुरूच्या हालचाली

देविदास वाणी



जळगाव ः तरसोद ते चिखलीदरम्यानचे (Tarsod to Chikhali Highway) अद्याप ३० टक्के काम अपूर्ण असताना, या महामार्गावरील (Highway)नशिराबादजवळ टोलनाका उभारणीस वेग आला आहे. ऑगस्ट महिन्यापासून या टोलनाक्यावरून (Tolnaca) टोलवसुली सुरू होण्याची शक्यता असली, तरी अनेक कामे अपूर्ण असताना टोलवसुली कशी होऊ शकते, असा प्रश्‍न वाहनधारक करीत आहेत. कामे अपूर्ण असताना टोल वसूल करून कंत्राटदार (Contractor) अजब फंडा वापरत असल्याचे चित्र आहे.( highway widening work left for movements start nasirabad tolnaka)


तरसोद ते चिखलीदरम्यान या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातील तरसोद ते भुसावळपर्यंतचे काम अद्याप ३० टक्के बाकी आहे. त्यात भुसावळ नाहटा कॉलेजजवळील साइड रस्ते, भुसावळ रेल्वे उड्डाणपुलाचा एक भाग (भुसावळकडून जळगावकडील), सुनसगावजवळील रेल्वे पुलाचा भाग (भुसावळकडून जळगावकडील), नशिराबाद उड्डाणपुलाजवळील दोन्ही साइड रस्ते, सर्व ठिकाणचे पथदीप, दुभाजकामध्ये वृक्षारोपण, पथदर्शक फलक आदी कामे बाकी आहेत. यूरिनलनची कामेही अपूर्ण आहेत. असे असताना नशिराबादपुढील सिमेंट फॅक्टरीजवळच टोलनाका उभारण्यात आला आहे. त्याचेही काम जोरात सुरू आहे. टोलवसुली केबिन, झेब्राक्रॉसिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, व्यवस्थापन कक्ष, टोलवसुलीच्या केबिन, सीसीटीव्ही कॅमेरे, छत आदी कामांना वेग आला आहे.

दहा विंगची सोय
टोलवसुली करताना वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी येथे फास्टॅग प्रणालीचा वापर होणार आहे. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येकी पाच-पाच अशा दहा विंगची उभारणी येथे करण्यात आली आहे. जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही दिशांना टोलकाट्याचे कामही सुरू आहे.

नशिराबादजवळ उभारलेल्या टोलनाक्यावरून टोलवसुली लवकरच सुरू होईल. त्यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू आहे. ही निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून जाहीर होईल. आगामी १५ दिवसांत याबाबत निर्णय होईल.
-चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT