जळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या फागणे-तरसोद टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपासून रखडले असून, या कामाच्या मक्तेदारास आता थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच (Nitin Gadkari) अल्टिमेटम दिला आहे. काम लवकर पूर्ण करा अन्यथा कारवाई करू, अशी नोटीसही मक्तेदारास बजावण्यात येणार आहे. महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणात फागणे- तरसोद टप्प्यातील ८७ किलोमीटरचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे व सध्याही संथगतीने सुरू आहे. तुलनेने तरसोद-चिखली काम उशिराने सुरू होऊन ७५ टक्के पूर्णही झाले.
मक्तेदारास नोटीस
रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत या कामाबाबत खासदार उन्मेष पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु काम सुरू झाल्यानंतर मध्येच मक्तेदार बदलला तर निविदाप्रक्रिया नव्याने करावी लागते व त्यात बराच काळ जातो. त्यापेक्षा या मक्तेदाराकडूनच लवकर काम पूर्ण करून घेण्यावर भर आहे. त्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात येणार आहे. कामाचा वेग न वाढविल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा गडकरींनी दिल्याचे खासदारांनी सांगितले.
सुटलेल्या भागासाठी ८४ कोटी
ाचौपदरीकरणाच्या या टप्प्यात पाळधी ते खोटेनगरपर्यंत व या मार्गातील गिरणा नदीवरील पुलासह शिवकॉलनीलगतचा रेल्वे उड्डाणपूल, तसेच कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचा भाग सुटला होता. या कामासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. गडकरींनाही भेटलो. त्यांनी या कामासाठी ८४ कोटींच्या निधीस तत्त्वत: मंजुरी देऊन कामासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही उन्मेष पाटील यांनी सांगितले.
कामाचा टप्पा : फागणे- तरसोद
अंतर : ८७.३ किलोमीटर
निविदा मंजूर : ९२५ कोटी
काम पूर्ण : ३० टक्के
मक्तेदार एजन्सी : आग्रोह इन्फ्रा.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.