समीर काकर, अन्सार शहा रुबाब शहा. Sakal
जळगाव

जळगाव : प्रेयसीच्या नखऱ्यांसाठी प्रियकराने केली घरफोडी

अडीच लाखांसह पाच तोळे सोने, एकूण सात लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - सिंधी कॉलनीतील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अडीच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण सात लाखांची घरफोडीची घटना घडली होती. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन विधिसंघर्षित बालकांसह दोन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. अटकेतील गुन्हेगारांच्या टोळीच्या म्होरक्याच्या प्रियसीचे नखरे उचलण्यासाठीच अटकेतील समीर काकर याने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले आहे. शहरातील सिंधी कॉलनीत समाधा आश्रमजवळील कंवरनगरातील रोहित इंद्रकुमार मंधवानी (वय ३०) कुटुंबीयांसह शुक्रवारी (ता. २२) अमरावती येथे गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते सोमवारी (ता. २५) सकाळी आठच्या सुमारास घरी परतले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. घरात शिरल्यावर हॉल, बेडरुम, किचन व स्टोरमधील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. तसेच कपाटात ठेवलेले सात तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड कपाटातून लंपास होती. सोन्याचे व चांदीचे दागिने, मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या व्हीएचए कंपनीच्या ४० मिक्सरच्या मोटारीदेखील चोरीस गेल्या होत्या. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेने तीन संशयितांना गुप्त माहितीवरून ताब्यात घेतले.

संशयितांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तांबापुरा बिस्मिल्ला चौकातील समीर हनिफ काकर (वय २०), अन्सार शहा रुबाब शहा (वय १९) या दोघांसह त्यांचे दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी चालवल्यावर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संशयितांना जिल्‍हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडीत, तर उर्वरित दोघांना रिमांडहोममध्ये रवाना केले.

प्रेयसीच्या शॉपिंगसाठी पैशांची गरज

टोळीचा म्होरक्या समीर काकर, अन्सार या दोघांचेही परिसरात प्रेमप्रकरण सुरू आहे. त्यात समीर अधिकचा हौशी. त्याच्या प्रेयसीकरिता महागडा ड्रेस, चप्पल व इतर शॉपिंग करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यातच सिंधी कॉलनीतील मंधवानी यांच्या घराची टीप त्याला मिळाली. मागचा-पुढचा विचार न करता त्याने तिघांना सोबत घेत घरफोडी केली. त्यात दोन लाखांची रोकड हाती लागल्याने प्रत्येकाच्या हिश्श्यावर पन्नास हजार रुपये आले. त्याच दिवशी त्याने शहरातील एका मोठ्या शोरुममधून त्याच्या प्रेयसीकरिता महागडा ड्रेस खरेदी केला. तसेच इतरही शॉपिंग करून दिल्याचे टोळीतील अल्पवयीन संशयितांनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Maharashtra Weather Update : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी

Ram Navami Pune : पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात रामनवमी उत्साहात; विविध धार्मिक संदेश देणाऱ्या मिरवणुका, भाविकांची अलोट गर्दी!

Chhatrapati Sambhajinaga News: गळतीमुळे लागला चाचणीला ब्रेक; तिसऱ्या दिवशी २७ मिनिटांत आले १६ किलोमीटरपर्यंत पाणी

SCROLL FOR NEXT