जळगाव

भडगाव येथे शिस्तप्रिय गणेश मंडळांचा सन्मान

(स्व.) बापूजी फाउंडेशनचा उपक्रम; कोरोना नियमांचे काटेकोर पालन

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करीत आहेत. अशा मंडळांचा (स्व.) बापूजी फाउंडेशनतर्फे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी पाचोरा-भडगाव बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ प्रमुख पाहुणे होते. या वेळी शहरातील सर्व गणेश मंडळांचा आमदार लंके, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी लंके व वाघ यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे व फाउंडेशनच्या संस्थापक तथा युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील यांचे कौतुक केले. फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांनी मंडळांना गणेशोत्सव साजरा करताना शासनाला सहकार्य करण्याचे आवहान केले. यशस्वितेसाठी फाउंडेशनचे सदस्य हर्षल पाटील, विनोद पाटील, मधुकर वाडेकर, रवींद्र पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राजपूत, नीलेश पाटील, प्रथमेश पाटील, भोला पाटील, चेतन पाटील, प्रशांत सोनवणे, भय्या पाटील, अमोल पाटील, प्रशांत गालफाडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

लंके यांची मोटारसायकल सवारी

आमदार लंके यांचे भडगावात (स्व.) बापूजी फाउंडेशनतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनीही कार्यक्रमस्थळी मोठ्या गाडीवरून न जाता लखीचंद पाटील यांना मोटारसायकलवर मागे बसवत स्वत: गाडी चालविली. त्यानंतर प्रहार संघटनेतर्फे फवारणी ट्रॅक्टरचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालविला. त्यांना भेटण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT