Jalgaon Municipal Corporation News esakal
जळगाव

Jalgaon : महापालिकेतर्फे सर्व्हेक्षणानंतर दुसऱ्यांदा घरपट्टीची बिले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतर्फे घरपट्टीच्या नवीन आकारणी तसेच त्यावर झालेल्या सुनावणीनंतर आता दुसऱ्यांदा नागरिकांना घरपट्टीची बिले अदा करण्यात येणार आहेत.बिल मिळाल्यानंतर पंधरा दिवसात भरणा केल्यास पाच टक्के सूट देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे घरपट्टी सन २१-२२ मध्ये नवीन सर्वेक्षण करून आकारणीच्या नोटीस बजावल्यानंतरच नागरिकांनी आगावू भरणा केला होता, यातून महापालिकेला तब्बल ३४ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले होते. (Housing bills for second time after survey by Jalgaon Municipal Corporation Latest Jalgaon News)

जळगाव महापालिकेतर्फे जळगाव शहरातील मिळकतींचा सर्वे करून नवीन सन २०२१-२२ मध्ये आकारणी करण्यात आली आहे. आकारणीनंतर नागरिकांना बिलाच्या नोटीस बजावण्यात आल्या त्यानंतर सुनावणी घेऊन ज्यांचा आक्षेप होता त्याठिकाणी फेरमोजणीही करण्यात आली. अद्यापही ज्यांचे आक्षेप आहे, त्यांच्याही सुनावणी घेण्यात येत आहे.

मात्र आता नागरिकांना महापालिकेतर्फे सन २०२२ ते २०२३ ची नवीन आकारणीनुसार बिले बजावण्यास प्रारंभ होणार आहे. महापालिकेच्या चारही प्रभागांतर्गंत बिलांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले, की महापालिकेत अगोदर शहरात ९८ हजार मिळकती होत्या, नवीन सर्व्हेक्षण केल्यानंतर तब्बल १ लाख २० हजार मिळकती झाल्या आहे.

तब्बल २२ हजार नवीन मिळकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी मागणी रकमेतही वाढ झाली आहे, पूर्वी ५२ कोटी रुपयांची मागणी होती, आता ती तब्बल ८७ कोटी रुपयांची झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

पाच टक्के सूट

महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांना घरोघरी बिले अदा करण्यात येणार आहेत, बिल मिळाल्या तारखेपासून पंधरा दिवसात भरणा केल्यास त्यांना पाच टक्के सूट देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ऑनलाइन सुविधा

महापालिकेतर्फे भरणार करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे, नेट बँकिंग, फोन पे व्दारेही भरण्याची सुविधा असणार आहेत. प्रत्येक प्रभाग कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT