100 plus Parrots resued  esakal
जळगाव

Jalgaon : वादळातील शेकडो पोपटांना जीवदान

देवीदास वाणी

जळगाव : वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत वादळी पावसात (Stormy Rains) निलगिरीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या. त्यात वादळी पावसाचा मारा बसून शेकडो पोपट (Parrots) जखमी झाले. तर तितकेच मृत्युमुखी पडले. याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना मिळाली. त्यांनी संस्थेच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सुमारे ३५० पोपटांचा जीव वाचवला. (Hundreds of parrots rescued in Monsoon storm Jalgaon News)

अचानक आलेल्या वादळी पावसाच्या माऱ्याने ओले होऊन पाऊस पडावा तसे एक एक करत शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधला. संस्थेचे सर्पमित्र रामटेके यांनी घटनास्थळ गाठले. शेकडो पोपट मृत्युमुखी पडले होते, तितकेच जखमी ओले होऊन विव्हळत पडले होते. सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे, भूषण कोळी, लखन लोहारे, अक्षय तेली, मनीष कोळी, सागर कोळी, राहुल कोळी, हर्षल कोळी, प्रतीक मेढे, धीरज सुरवाडे, आकाश सोनार, अनिकेत वांकेडे, कुणाल गुरचड, ललित, लखन रांसिंगे, मनोज अंबोडे, राहुल खरात, ओम शिंदे आदी सहकाऱ्यांनी तातडीने पोपटांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केली. सोबत दोन पिंजरे होते.

त्यात काही पक्षांना ठेवले. परिसरातील एका रूममध्ये पोपटांना एकांतात सोडून खिडकी, दार उघडे ठेवण्यात आली. बाहेरून मांजर किंवा कुत्रा आत येणार नाही याची काळजी घेण्यात आली. तासाभरात ट्रेस कमी झाल्याने पोपटांत धीर आला. सुमारे ३० ते ४० पोपटांनी आकाशात भरारी घेतली.उर्वरित पोपटांना रात्री त्याच रूममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. वन विभागास माहिती देऊन पक्ष्यांना सकाळी लवकर सोडण्याबाबत चर्चा झाली.

सुरक्षित स्थळी जाऊन पिंजरे उघडताच सर्व पोपट एक एक करत आकाशात भरारी घेत होते. ते बघून वन्यजीव संरक्षण संस्था आणि वन कर्मचारी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh: येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू; सहर शेख यांना पाठिंबा देत इम्तियाज जलीलांचे वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?

Badrapur Crime : पत्नीचा खून केल्याच्या संशयावरून पतीला घेतले ताब्यात; हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा केला बनाव

Bigg Boss Marathi 6: शिवी घालण्यावरून प्राजक्ता- अनुश्री रितेशसमोरच भिडल्या ; "म्हणजे शिवी द्यायची का?"

Mumbai Goa Highway Traffic : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीचे विघ्न! मुंबई गोवा महामार्गासह इतरही ठिकाणी वाहतूक कोंडीने पर्यटक प्रवासी बेजार

IndiGo Flights Cancelled : सरकारचा ‘इंडिगो’ला आणखी एक मोठा दणका! तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे केली आहेत कमी

SCROLL FOR NEXT