woman abused esakal
जळगाव

Jalgaon : घर घेण्यासाठी पत्नीचा छळ

घर घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत, या कारणावरून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली व शारीरिक व मानसिक छळ केला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : घर घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत यासाठी एमआयडीसी परिसरातील विवाहितेचा पतीकडून छळ होत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात दिव्या ज्ञानेश्वर मोहोटे (वय २३) यांचा पुणे जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्ञानेश्वर मधुकर मोहोटे यांच्या सोबत विवाह झाला आहे. सद्य:स्थितीत दिव्या मोहोटे या आळंदीला राहतात.

दिव्या यांनी आळंदीचे घर घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत, या कारणावरून पती ज्ञानेश्वर मोहोटे व सासू अलका मोहोटे यांनी दिव्या हिस वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली व शारीरिक व मानसिक छळ केला. यास मामसासरे यांनीही प्रोत्साहन दिले. दिव्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (ता. १५) ज्ञानेश्वर मोहोटे व सासू अलका मोहोटे व मामसासरे अरुण पंढरीनाथ फरगडे (तिन्ही रा. संगमनेर, जि. पुणे) आदींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संजय धनगर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

SCROLL FOR NEXT