Husband who verbally gives talaq is sentenced to 2 years hard labour jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तोंडी तलाक देणाऱ्या पतीला 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

विवाहितेचा छळ करून तिला तोंडी तलाक देणाऱ्या चिनावल (ता. रावेर) येथील पतीला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहितेचा छळ करून तिला तोंडी तलाक देणाऱ्या चिनावल (ता. रावेर) येथील पतीला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तीन तलाक प्रकरणातील अशा प्रकारची ही शिक्षा भारतातील दुसरी घटना असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. (Husband who verbally gives talaq is sentenced to 2 years hard labour jalgaon news)

चिनावल (ता. रावेर) येथील तबस्सूम शेख हसन (रा. चिनावल, वय २५) या महिलेचा विवाह शेख हसन शेख सत्तार (३०) याच्याशी झाला होता. विवाहानंतर दोन वर्षे ती आपल्या सासरी पती आणि सासू रुखसानाबी शेख सत्तार (५८) यांच्याबरोबर राहत होती.

विवाहाच्या दोन वर्षांनंतर मात्र तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. मला जनावरांचा व्यापार करण्यासाठी ५० हजार हजार रुपये तुझ्या वडिलांकडून आण, असे पतीने सांगितले.

यावर वडील गरीब असल्याने ही रक्कम देऊ शकणार नाही, असे विवाहितेने सांगितल्यावर पती तिला मारहाण करून शिवीगाळ करायचा.

या छळाला कंटाळून ती एकदा वडिलांकडेही निघून गेली. ६ मे २०२० ला शेख हसन याने पत्नीला बाथरूममध्ये कोंडून शिवीगाळ केली आणि फोन करून तिच्या वडिलांना चिनावलला बोलावले.

या वेळी शेख हसन याने तिचे आई, वडील आणि भाऊ यांच्यासमोर तीनवेळा तलाक शब्द उच्चारून तिला तलाक दिला. याबाबत विवाहितेने सावदा पोलिस ठाण्यात ९ मेस फिर्याद नोंदविली होती.

रावेर न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकारी वकील एल. एन. तायडे यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायाधीश अनंत बाजड यांनी या प्रकरणी शेख हसन शेख सत्तार याला दोन वर्षे शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला. २५ हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावली.

मात्र विवाहितेची सासू रुखसाना बी हिची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ॲड. तायडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की अशाप्रकारे तीन तलाक प्रकरणी शिक्षा झाल्याचे ही भारतातील दुसरी व जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT