Husband Wife Fight esakal
जळगाव

Husband Wife Fight : कोर्टात खटला चालु अन् पती पत्नीत जुंपली फ्रीस्टाईल; जाणून घ्या नेमक काय घडलं

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातीलच माहेर व सासर असलेल्या विवाहितेने पतीविरोधात कौटुंबिक वादातून विभक्त होत खावटीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असताना, पती व पत्नी यांच्यासह नातेवाइकांमध्ये न्यायालयाच्या आवारातच तुफान हाणामारी झाली. जखमी पतीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शनिपेठेतील विवाहितेने कौटुंबिक वादातून फातेमानगरातील पतीविरुद्ध जिल्हा न्यायालयात खावटीसाठी दावा दाखल केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून पती न्यायालयात हजर राहत नव्हता. बुधवारी (ता. १६) नवरोबा दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात अवतरला. पती दिसताच संतप्त पत्नीने त्याला पकडून जाब विचारल्याने वादाला सुरवात झाली व दोन्ही कुटुंबांत तुफान हाणामारी झाली. या वेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. हाणामारीत पती गंभीर जखमी झाला असून, त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. जखमीच्या जबाबावरून शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT