Illegal liquor kiln destroyed by police esakal
जळगाव

हजारो रुपयांची अवैध दारूची हातभट्टी उध्वस्त

ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी छापा टाकून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच उध्वस्त केला.

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार - जिवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील विविध गावांतील शिवारात अवैध गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी छापा टाकून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच उध्वस्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

तालुक्यातील सांगवी, बाणगाव व खेरडे शिवारात अवैध गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना शनिवाी (ता.१२) मिळाली. त्यावर पथकाने सदर ठिकाण गाठून १४०० लिटर हातभट्टीची दारू, ९ हजार रुपये किंमतीची १४ कच्चे रसायन असा एकूण ६५,८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी अवैध दारूचा विषय हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे सदर कारवाई ही उत्पादन शुल्क विभागाने करणे अपेक्षित असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोउनि लोकेश पवार, पोना शांताराम पवार, पोना देविदास पाटील, पोना भूपेश वंजारी, पोना ज्ञानेश्वर बडगुजर, पोना प्रेमसिंग राठोड आदींनी कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT