illegal sand transportation esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : बेकायदा वाळू वाहतूक; 4 Tractor ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार, आव्हाणे फाटा परिसरातून पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ‘सकाळ’ने गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत मालिका सुरू केल्यानंतर पोलिस आणि महसूल प्रशासनाने कारवाईचा धडका लावला आहे.

जळगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात पाणी असताना, जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिचून माफिया वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खुर्दमार्गे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी (ता. ८) दुपारी बाराला मिळाली. (Illegal sand transport Possession of 4 Tractors Jalgaon Crime News)

पोलिस पथकाने दुपारी दोनला निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंपाजवळील हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे, तर खेडी खुर्द शिवारातून वाळूची अवैध वाहतूक करणारे विना क्रमांकाची चार ट्रॅक्टर पकडले.

त्यांच्याकडे परवाना असल्याची चौकशी केली असता, त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक राजेंद्र लोटू सोनवणे (वय ३०, रा. खेडी खुर्द पो. कढोली, ता. एरंडोल), गणेश दरबाज कोळी (२९, रा. कोळी वाडा, पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT