Illegally Alcohol sales Stop Increase state government revenue sakal
जळगाव

जळगाव : अवैधरीत्या मद्यविक्री थांबवा, राज्य सरकारचा महसूल वाढवा

वाइन असोसिएशनचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ग्रामीण भागात जेथे लोकसंख्या १५०० पेक्षा कमी आहेत, तेथील दारू (Alcohol) दुकाने अद्याप बंद आहेत. ती लवकरात लवकर सुरु करण्यात यावी जेणेकरून शासनाच्या महसूलमध्ये वाढ होऊन अवैध विक्रीला आळा बसेल, यासह विविध मागण्या जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे शुक्रवारी (ता. १७) निवेदन देवून केली आहे.

अध्यक्ष अॅड. रोहन बाहेती, सचिव पंकज जंगले, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी मंत्री पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत लवकरच याबाबत बैठक घेत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्‍वासन मंत्री पवार यांनी दिले.

मद्यविक्रीच्या व्यवसायात मार्जिन कमी होत असून शासनाकडून रिटेल मार्जिन वाढवून मिळावे, फक्त ७ टक्‍के मार्जिन मिळत आहे ते १२ टक्के करून मिळावे. कारण व्यवसाय कमी असल्यामुळे नफा कमी असतो. मद्य विक्री करणाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृतीचे नागरिक मारहाण करतात. त्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT