जळगाव

पत्नीला भाच्यासोबत बघितले आक्षेपार्ह स्थितीत, अन्...

सकाळ डिजिटल टीम

रावेर (जि. जळगाव) : पत्नीला भाच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा लाकड्याच्या दडुक्याने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाल (ता. रावेर) येथे उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह मित्राला अटक केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल येथील बर्डी परिसरात राहणाऱ्या साधू मानसिंग बारेला याच्या घरात दूरचा भाचा भायला भंगा बारेला (रा. पिंपलखुंटा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) हे तिघे दारू पीत होते. भायला याने साधू यास दारू आणण्यास सांगितले. घरात असलेल्या मुलीला खाऊ खाण्यास पैसे देऊन दुकानात पाठविले. यानंतर त्याने त्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला.

यावेळी दारू घेऊन घरी परतलेला पतीला त्याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध करताना बघितले. त्यामुळे संतप्त झालेल्या साधूने पत्नी सायजाबाईला लाकडी दंडुक्याने हातावर, पायावर, बरगडीवर गंभीर मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, अनिस शेख, राजेंद्र राठोड, महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, श्रीराम कांगणे, नरेंद्र बाविस्कर, संदीप धनगर, अतुल तडवी, कुणाल पाटील यांनी पाल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलिस दीपक ठाकूर, सोनू तडवी करीत आहे.

दोन्ही आरोपी ताब्यात

पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून साधू मानसिंग बारेला (रा. पाल, बर्डी) व भायला भंगा बारेला यांना (पिंपलखुंटा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले.

दुसऱ्या दिवशी आली घटना उघडकीस

पती साधो बारेला याने पत्नीस गुरुवारी सायंकाळी चार वाजता आक्षेपार्ह स्थितीत बघितल्यानंतर ठार मारले. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह रात्रभर घरीच पडला होता. दुसऱ्या दिवशी सायजाबाईचे वडील चमारसिंग दलसिंग बारेला (रा. गारबर्डी) यांना घटनेची माहिती मिळलताच शुक्रवारी सकाळी पोलिसांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT