imperial data in the original draft obc reservation jalgaon sakal
जळगाव

मूळ मसुद्यात इम्पिरिकल डाटा सादर करा; ओबीसी महासंघाची मागणी

ओबीसींच्या इम्पिरिकल डाटा मूळ मसुद्यात त्वरित सादर करावा, त्रिस्तरीय कमिटीद्वारे ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ओबीसींच्या इम्पिरिकल डाटा मूळ मसुद्यात त्वरित सादर करावा, त्रिस्तरीय कमिटीद्वारे ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची त्वरित घोषणा करावी, ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, एसबीसी समाजाचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत बसवावे, महाज्योती या संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (ता. ११) ओबीसी महासंघ व बाराबलुतेदार महासंघातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

बाराबलुतेदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर, प्रदेश सदस्य ईश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष भारती कुमावत, महानगर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, शहर महिला अध्यक्षा छाया कोरडे, बहुजन मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महानगर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी निवेदन दिले. ओबीसींचे आरक्षण कोर्टाने रद्द करून सरकारच्या दस्त दाखल करण्यातील झालेल्या चुका दुरुस्त करून सोबत इम्पिरिकल डाटा आवश्यक त्या मसुद्यामध्ये पुन्हा सादर करावा, असा आदेश केला. विद्यमान सरकारला हे आरक्षण मनापासून करावयाचे नाही हे यावरून अधोरेखीत होत आहे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी व्हीजेएनटी परिषद तसेच बाराबलुतेदार महासंघ यांचे वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे जाऊन पदाधिकारी, ओबीसी समाज घटक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने निवेदन दाखल केले. जिल्हा उपाध्यक्ष सखाराम मोरे, बंटी नेरपगारे, महानगर महिला अध्यक्ष छाया कोरडे, उपाध्यक्ष आरती शिंपी, अलका सोनवणे, पुनम खैरनार, अनिल खैरनार, श्यामकांत शिंपी, अशोक पंडीत, विलास कुंभार, सुरेश बाविस्कर, पवन सिल्लोडकर, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT