Agriculture news esakal
जळगाव

उच्च तंत्रज्ञानाद्वारे ‘स्मार्ट’ शेती महत्त्वाची

भविष्यात शेतीशिवाय सर्वांगीण प्रगती करणे केवळ अशक्य आहे, असा सूर फालीमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांमध्ये उमटला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जमिनीची सुपीकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल. भविष्यात शेतीशिवाय सर्वांगीण प्रगती करणे केवळ अशक्य आहे, असा सूर फालीमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांमध्ये उमटला.

जैन हिल्स येथे फालीचे आठव्या संमेलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात झाली. आघाडीच्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुसंवाद साधला.

या शेतकऱ्यांचा समावेश

यात उमाळे येथील उमेश खडसे, पिंपळगावचे भागवत भाऊराव पाटील, पहूरचे शैलेश कृष्णा पाटील, नायगावचे विशाल किशोर महाजन, अटवाड्याचे विशाल अग्रवाल या शेतकऱ्यांचा समावेश होता. पहूरचे शैलेश पाटील यांनी आपल्या शेती अनुभव कौशल्याचे भंडार विद्यार्थ्यांनसमोर खुले केले. विशाल अग्रवाल यांनी जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून केळी, हळद, भगवा डाळिंब टिश्यूकल्चर, अतिसघन आंबा लागवड, जैन स्वीट आॕरेंज, असे फलोत्पादन, पांढरा कांदा, कापूस, आले, सोयाबीन, तूर, करार शेती याबाबत अनुभव सांगितले. उमाळे येथील उमेश खडसे यांनी टरबुजाचे उत्पादनात ठिबक व तंत्रज्ञानाचा वापराच्या फायद्याबाबत सांगितले. आॕटोमेशनामुळे होणारी पाण्याची बचतीवर विशाल महाजन यांनी संबोधले. फालीच्या काही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला. रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

१, २ तसेच ४ व ५ जूनला होणाऱ्या या संमेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी ‘फाली’च्या पहिल्या टप्प्यातील संम्मेलनासाठी महाराष्ट्रातील ६७ शाळांमधील ४०० विद्यार्थी व ४० ए ई. (ॲग्रीकल्चर एज्युकेटर) यांनी सहभाग घेतला.

आस्थापनांसह गांधीतीर्थला भेट

विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी जाणून घेतले. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड कशी केली जाते, याबाबत माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

Failed Student Scheme : नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा! जूनमध्ये अपयश आल्यास डिसेंबरमध्ये मिळणार आणखी एक संधी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ११ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

UP : मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या नियमांत बदल; अॅसिड हल्ल्यातील पीडितांचाही समावेश, अर्ज कसा करायचा?

निवडणूक कार्यक्रम जाहीर! सोलापूर बार असोसिएशनसाठी 4 ऑगस्टला मतदान; वकिलांना अर्ज घ्यायला अन्‌ भरायला 2 दिवसांची मुदत, ‘हे’ आहेत निवडणुकीसाठी इच्छुक

SCROLL FOR NEXT