jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघा आरोपींना कारावास, दंड

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे अवैध दारुविक्री करणाऱ्या दोघांना पाचोरा न्यायालयाने तीन महिने कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्यातील दोन आरोपींना शुक्रवारी (ता. २५) पाचोरा न्यायालयाने तीन महिने कारावास व प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पिंपळगाव (हरेश्‍वर) पोलिस ठाणे हद्दीत खंडू माळी व संजय शिंदे हे अवैध दारूविक्री करत असल्याबाबत पोलिस शिरस्तेदार उज्ज्वल जाधव यांनी २०२१ मध्ये पिंपळगाव (हरेश्‍वर) पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले होते. (Imprisonment fine for two accused who sold illegal liquor Jalgaon Crime News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या प्रकरणी पाचोरा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्या. एम. जी. हिवराळे यांनी दोघांना तीन महिने सक्षम कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल पाटील यांनी काम पाहिले व त्यांना पैरवी पोलिस कर्मचारी म्हणून प्रदीप पाटील व केसवाच राजेंद्र पाटील यांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT