Death News esakal
जळगाव

Crime News : प्रियकराच्या मदतीने पतीला आत्महत्येस पाडले भाग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहितेशी प्रेमसंबध जुळल्यानंतर तिच्या पतीला मानसीक त्रास व मारण्याची धमकी देण्यासह पत्नीकडूनच छळ केला जात असल्याने गेंदालाल मील येथील विजय माणिक महाजन (वय ३२) या तरुणाने मृत्युला कवटाळले होते. (In case of husband suicide Crime against wife lover jalgaon crime news)

या प्रकरणी तपास पुर्ण होवुन शहर पोलिसांत विजय यांची पत्नी वैशाली महाजन (रा. अकोले खुर्द, पो. खांडवी, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीचे त्याच परिसरातील अजय ज्ञानेश्‍वर शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे विजयला समजले.

त्यानंतर विजय व त्याचा भाऊ गणेश हे दोघे शिंदे याला समजविण्यासाठी गेले होते. मात्र, त्याने दोघांना शिवीगाळ करीत धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतरही फोनवरुन ‘तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असून मी तिला एक दिवशी पळवून घेवून जाईल.

तुझ्याकडून काय होईल ते करुन घे’ अशी धमकी तो देत होता. विजयची पत्नीदेखील कुरापत काढून पतीसोबत भांडण करत असायची. दोघांच्या जाचाला कंटाळून विजय याने २५ नोव्हेंबर २०२१ ला गळफास घेवून आत्महत्या केली होती. पोलीस उपनिरीक्षक रमेश शेंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT