Nests made by sorghums in trees, thick greenery near wells. esakal
जळगाव

Jalgaon News : अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला..! काळाच्या ओघात सुगरणींच्या वसाहतीही संकटात

किशोर पाटील

Jalgaon News : ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला’ अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबद्ध करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे सुगरणीचा खोपा सर्वत्र परिचित झाला. (In course of time colonies of sugarani are also in crisis jalgaon news)

मात्र ग्रामीण भागांत पावलोपावली सर्वत्र दिसणारे सुगरण व इतर पक्ष्यांची घरटी वाढत्या वृक्षतोडीसह विहिरीत लोंबकळणाऱ्या झुडपाचीही तोड झाल्याने पशुपक्षी, सुगरणी अन्यत्र स्थलांतरीत होऊन त्यांच्या खोप्यांना कडुलिंब, बाभुळ, पिंपळ, बदाम, हिवरांच्या झाडांनी आपल्याकडे आकर्षित करून कवेत घेतले. रस्त्याने जातांना झाडा- झाडांवर लोंबकळणारे सुगरणीचे खोपे वाटसरूंना आपल्याकडे आकर्षित करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

प्रत्येक पक्ष्यांना त्यांची अंडी व पिलांची जोपासना करताना सुरक्षिततेची काळजी असते. त्यामुळे सुगरण पक्षाचे घरटे बोरी, सुबाभळी आदी काटेरी झाडं किंवा जेथे साप, मुंगूस, माणूस, शिकारी पक्षी जाणार नाहीत अशा विहिरीकाठच्या झुकलेल्या झाडांवर ते खोपे तयार करतात. कारण त्यांची अंडी व पिलं खाणारे साप, मुंगूस, शिकारी पक्षी यांच्याबरोबरच घराच्या बेडरूम, ऑफिसची शोभा वाढविण्यासाठी त्यांचे खोपे चोरणाऱ्या माणसांचीही त्यांना भीती असते.

मागील अनेक वर्षांपासून वृक्षतोड आणि विहिरी, बारवा कमी झाल्याने त्यांनीही बदल स्वीकारला आहे. बेसुमार वृक्षतोड, विहिरीऐवजी घेतल्या जाणाऱ्या कूपनलिका, नदी पात्रातून केली जाणारी पाईपलाईन आदीमुळे सुगरणीच्या पारंपरिक वसाहती संकटात सापडल्या आहेत.

ते पण काळानुरूप या बदलांशी जुळवून घेत आहे. हे पक्षी आता आपली घरटे बनविण्यासाठी जागा बदलत आहे. बेसुमार झालेल्या वृक्षतोडीने सुगरणीच्या खोप्याची आता कूसच बदलली आहे. हळुहळू आता काळाच्या ओघात जागोजागी दिसणारे घरटे लुप्त होत आहेत.

ग्रामीण भागातही दिसेनासे

विहिरीजवळील झाडे, गर्द हिरवाईच्या ठिकाणी सुगरणीची किलबिलाट ऐकावयास मिळतो, अगदी वादळी वारे, अन् मुसळधार-पावसात सुगरणीची घरटी फांदीला घट्ट बांधलेले असल्याने सुरक्षित राहतात. सुगरणीची घरटे बांधण्याची कला मानवाला अचंबित करणारी आहे. परंतु यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने त्याचा परिणाम मनुष्याप्रमाणे निसर्गातील अन्य जीवांवरही होताना दिसत आहे. यंदा सुगरणीच्या घरट्यांची संख्या कमालीची घटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT