Prof. VL Maheshwari esakal
जळगाव

KBCNMU News : संशोधन, नवोपक्रम गटात प्रा. माहेश्‍वरींचा समावेश; नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग

सकाळ वृत्तसेवा

KBCNMU News : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संशोधन क्रियाकलापांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गटात’ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या गटाची स्थापना केली आहे.(In research innovation group Prof Including Maheshwari jalgaon KBCNMU news)

असे असेल कार्य

राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या व नवोपक्रमांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करणे, राज्यातील प्राधान्य संशोधन क्षेत्रे निश्चित करणे, संशोधन प्रकल्पाचा मागोवा घेण्यासाठी यंत्रणा तयार करणे, संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करणे, व्याप्ती वाढवणे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि उद्योगांचा सहभाग व सहकार्य वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करणे आदी प्रमुख कार्य या कार्यबल गटाचे असणार आहेत.

या गटात सहा जणांचा समावेश असून त्यामध्ये कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच याच विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांचा समावेश आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, पुणे विद्यापीठाच्या नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. संजय ढोले तसेच सीओईपीचे प्रा. एन. बी. ढोके यांचा समावेश आहे.

पहिल्या तीन महिन्यात राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या सद्य:स्थितीचा अहवाल या गटामार्फत शासनाला सादर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT