Police Inspector Pratap Ingle and Sarpanch Yuvraj Patil while inaugurating the health sub-centre. esakal
जळगाव

Jalgaon : तोरनाळे आरोग्य उपकेंद्राचे उद्‌घाटन; ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर पालटले रुपडे

सकाळ वृत्तसेवा

फत्तेपूर (जि. जळगाव) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील तोरनाळे आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन पहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे व तोरनाळे गावचे सरपंच युवराज पाटील यांनी संयुक्तपणे फीत कापून केले. गेल्या पाच वर्षांपासून दयनीय अवस्थेत असणाऱ्या आरोग्य उपकेंद्राचे रुपडं सरपंच व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे पालटले. (Inauguration of tornale Health Sub Centre After follow up by Sakal News paper Latest Jalgaon News)

याप्रसंगी प्रताप इंगळे म्हणाले, की जागतिक कोरोना महामारीत आपण मरणाच्या दहशतीखाली होतो. त्या काळातही पोलिस, आरोग्य यंत्रणा व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी आपले कर्तव्य सुरुच ठेवले, ही अभिमानाची व आनंदाची बाब आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे व डॉ. पल्लवी राऊत-सोनवणे यांनी सपत्नीक धन्वंतरीचे पूजन केले.

याप्रसंगी जालमसिंग पाटील, सुपडूसिंग पाटील, महेंद्रसिग पाटील, कृष्णा पाटील, डॉ. संदीप जाधव, डॉ. श्यामल इंगळे, डॉ. किरण धनगर, आरोग्यसेविका सुनंदा सोनवणे, सुनील पाटील उपस्थित होते. डॉ. राजेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. उद्‌घाटनाच्या दिवशी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेत १७ गरोदर मातांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन, वजन-उंची, अल्बुमीन आदी तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी मनीषा वाकोडे, सुनील पाटील, सारिका मांडोळे, गटपर्वतक सुनीता पाटील, आशा स्वयंसेविका अर्चना पाटील उपस्थित होते.

या आरोग्य उपकेंद्राबाबत ‘सकाळ’मध्ये सर्वप्रथम ८ मे २०१८ ला ‘तोरनाळे आरोग्य उपकेंद्राची दयनीय स्थिती’ अशी बातमी प्रकाशित झाली होती. तेव्हापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि विद्यमान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्याकडे ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. अंगणवाडीसेविका अनुराधा तायडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ आरोग्यसेवक भागवत वानखेडे यांनी आभार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT