Punjab Mail Punjab Mail
जळगाव

भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडीचे ११० व्या वर्षात पदार्पण !

पूर्वी मुंबई ते पेशावर चालणारी पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटली

चेतन चौधरी


भुसावळ : भारतीय रेल्वेतील (Indian Railway)सर्वात जुनी गाडी अशी ओळख असलेल्या मुंबई ते हावडा धावणार्‍या पंजाब (Punjab Mail) मेलने १ जूनला ११० व्या वर्षांत पदार्पण केले. दरम्यान, जुने डबे सोडून या गाडीला मंगळवारपासून नवीन एलएचबी कोच लावण्यात आले. या नवीन आकर्षक डब्यांमुळे ही गाडी उजळून निघाली असून प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुखद प्रवासाचा (Travel) अनुभव मिळणार आहे.

(indias oldest train launches in one hundred ten year)

Old Punjab Mail

पंजाब लिमिटेड म्हणून आधी होती ओळख

ग्लॅमरस फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांनी अधिक जुनी असलेली आणि पूर्वी मुंबई (Mumbai) ते पेशावर (Peshawar) चालणारी पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटली. पंजाब मेल ही बॅलार्ड पियर मोल स्टेशन म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. तिला तेव्हा पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड संबोधन जायचे.

Old Punjab Mail Railway coaches

अवघे ९६ प्रवासी घेवून धावायची गाडी

ही गाडी मुंबईच्या बॅलार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे सुमारे ४७ तासांत २ हजार ४९६ किमी अंतर कापत असे. ट्रेनला सहा डबे जोडलेले असत. त्यापैकी तीन प्रवासी व टपालासाठी होते. तीन प्रवासी डब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ प्रवाशांची होती. प्रथम श्रेणीच्या व दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवलेले सर्व डब्बे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरीडॉर कार) होते.

New Punjab Mail Railway coaches

फाळणीपूर्वी वेगवान गाडी
फाळणीपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटीश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात जात होता. पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. १९१४ पासून या ट्रेनचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT