inspection Maintain quality of work Jayashree Mahajan MLA Bhole jalgaon sakal
जळगाव

जळगाव : कामांची गुणवत्ता ठेवा, मक्तेदारांची दलाली नको; जयश्री महाजन

महापौर जयश्री महाजन : आमदार भोळेंसमवेत कामांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रस्त्यांची तसेच इतर सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता ठेवा, ते चांगले असेल तरच त्याला मंजुरी द्या, केवळ मक्तेदारांची दलाली करू नका, अशी तंबी महापौर जयश्री महाजन यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आमदार सुरेश भोळे यांच्यासमवेत त्यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

जळगाव महापालिकेची शहरात रस्ते व गटारीची विविध विकासकामे सुरू आहेत. त्यातील काही कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या कामाच्या गुणवत्तेची पाहणी बुधवारी (ता. ६) महापौर जयश्री महाजन यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली, या वेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला. नेहरू चौक, पिंप्राळा, खेडी या भागातील रस्ते व इतर कामांची त्यांनी पाहणी केली.

अधिकाऱ्यांना तंबी

दुपारी कामाची पाहणी केल्यानंतर सायंकाळी त्यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर दालनात सायंकाळी ही बैठक घेण्यात आली. या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन यांनी अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व कामांची सद्यःस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट आदेशच दिले. त्यांनी सांगितले, की शहरातील कामे सुरू आहेत, मात्र त्याच्या गुणवत्तेवर लक्ष द्या, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. काम गुणवत्तेत नसेल तर तातडीने तसा अहवाल द्या. निकृष्ट कामास मंजुरी देऊन मक्तेदाराची दलाली करू नका.

....अन्यथा मक्तेदार काळ्या यादीत

शहरातील कामांबाबत महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की शहरात सद्यःस्थितीत एकूण १६८ कामांचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील ७२ कामे पूर्ण झाली आहेत. ७२ कामे अपूर्णावस्थेत आहेत. २२ कामे अद्याप मक्तेदाराने सुरूच केलेली नाहीत. त्यामुळे ही कामे मक्तेदारांनी आठ दिवसांत सुरू करावीत अन्यथा या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना पाच वर्षे महापालिकेची कोणतीही कामे देण्यात येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT