Railway Track News esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर-चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी

सकाळ वृत्तसेवा

पातोंडा : केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान अंतर्गत अमळनेर - चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी करण्यात आली. या वेळी अमळनेर येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एल. बी. सिंग (वाहतूक निरीक्षक), वाणिज्य निरीक्षक राजेंद्र देसाई, वरिष्ठ अनुभाग अभियंता राजेंद्र पाटील, वरिष्ठ अनुभाग अभियंता ओमप्रकाश यांनी पातोंडा ग्रामपंचायतीला भेट दिली.

केंद्र सरकारने संपूर्ण भारतातील ५० हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असणाऱ्या शहरांना रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गाने जोडण्यासाठी शक्ती व गती अभियान सुरू केले असून, जिल्ह्यातील चोपडा या शहराचा त्यात सामावेश करण्यात आला आहे. (Inspection of Amalner Chopda railway line Jalgaon News)

जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा सारखी इतर शहरे यापूर्वीच रेल्वेने जोडली गेली असल्याने सध्या चोपडा शहर हे ५० हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर असल्याने अमळनेर ते चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अमळनेर ते चोपडा दरम्यान असलेली व्यापारी दृष्ट्या व भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन सर्वेक्षणाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत सुरू असताना या दरम्यान पातोंडा येथे भेट देऊन सरपंच भरत बिरारी यांनी गावातील बॅंका, पतपेढी, सेवाभावी संस्था, प्राचीन मंदिरे, तीर्थक्षेत्र, चहार्डी साखर कारखाना, जीनिंग व उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रस्तावित रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल, याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

याप्रसंगी सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, विकासो संचालक किशोर मोरे, कर्मचारी राकेश पाटील, राजेंद्र वाणी, बाजीराव पवार, विश्वास बोरसे, रोजगारसेवक सुनील चित्ते व ग्रामस्थ प्रा. भूषण बिरारी, घनशाम पाटील, ईश्वर पाटील व अर्जुन लोहार आदी उपस्थित होते.

"जळगाव जिल्ह्यात चोपडा, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नाशिक जिल्ह्यात संगमनेर, बुलडाणा जिल्ह्यात चिखली आदी ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी शहरे केंद्र सरकारच्या शक्ती व गती अभियान अंतर्गत रेल्वेने जोडली जाणार आहेत. यामुळे या शहरांचे सांस्कृतिक व व्यापारी महत्व वाढीस लागण्यास सहकार्य होईल."

- राजेंद्र पाटील ,वरिष्ठ अनुभाग अभियंता, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT