Arrested News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगाराने घराजवळच केली चोरी; 50 हजारांच्या चोरीत संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दुमजली घराच्या खालच्या मजल्यातील खोलीतून पन्नास हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.

इश्तीयाक अली राजीक अली असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या अभिलेख्यावरील अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

तांबापुरा परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौकात सादीन शब्बीर पटेल कुटुंबीयांसह वास्तव्याला असून, त्यांचे बी.जे. मार्केट येथे दुकान आहे.

बुधवारी (ता. १) रात्री ते परिवारासह घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तुटलेला, तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. (Inveterate criminal steals close to home Suspect arrested in theft of Fifty thousand Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

घरातून पन्नास हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान इश्तीयाक अली राजीक अली या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केल्याची गुप्त माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली हेाती.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील पथकाने इश्तीयाक अली राजीक अली यास तांबापुरा भागातून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने गुन्हा कबुल केला आहे.

इश्तियाक अली याने दोन दिवसांपूर्वी तांबापुरातील एका तरुणावर तलवार उगारली हेाती. या गुन्ह्यातून बाहेर पडताच त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याने त्याला अटक करून न्या. जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयनो त्यास ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

PM Narendra Modi: ''दोनशे वर्षांत पहिल्यांदाच असं झालं'', अहिल्यानगरच्या देवव्रत रेखेंचं पंतप्रधानांकडून कौतुक

Mumbai Pollution: वाऱ्यामुळे प्रदूषणात घट! ‘एक्यूआय’मध्ये सुधारणा; कारवाईचाही हातभार

आंतरपाट काढताच एकमेकांना पाहून हसत सुटले सोहम आणि पूजा; बांदेकरांच्या सुनेची साडीही ठरतेय चर्चेचा विषय

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या 6 ठिकाणी स्ट्राँग रूम

SCROLL FOR NEXT