Ishwarlal Jain esakal
जळगाव

Political News : मी राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता, पण जामनेरसाठी माझा पाठिंबा महाजनांनाच; ईश्‍वरलाल जैन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. मात्र, जामनेर मतदारसंघासाठी माझा आशीर्वाद आणि राजकीय पाठिंबा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना कायम आहे.

याबाबत आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली आहे, असे स्पष्ट मत पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केले.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारातर्फे सुपारी बागेत झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. माजी खासदार जैन म्हणाले, की मी अडचणीत असताना, अनेकांनी मला सहकार्य केले. (Ishwarlal Jain saying I am staunch NCP worker but My support for Jamner is Mahajan Information also given to Sharad Pawar Jalgaon News )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात मंत्री गिरीश महाजनांचा वाटा मोठा आहे. जामनेर मतदारसंघात त्यांचे कार्य आजही चांगले आहे. त्यामुळे विरोध कशासाठी करायचा? शरद पवार यांना समक्ष भेटून आपण त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनाही मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी पटल्या आहेत.

मला पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवार यांनी विचारणा केली होती. तेव्हा मी नम्रपणे नकार दिला. वयाची सत्तरी पार केल्यानंतर सक्रिय राजकारणात येणार नाही, पण पक्षाला जामनेर सोडून जिथे-जिथे माझी गरज पडेल तिथे पक्षाचेच हित पाहील.

सद्यःस्थितीत आपल्या व्यवसायाची पूर्ववत घडी बसविणे सुरू आहे. त्यात विधान परिषदेचे माजी आमदार मनीष जैन जातीने लक्ष घालत आहेत. मनीष जैन काही काळानंतर राजकारणाच्या पटलावर पुन्हा येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT