crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : किरकोळ वादातून वरणगावमध्ये इसमाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथून जवळ असलेल्या आयुध निर्माणी वसाहतीच्या हद्दीला लागून दर्यापूर शिवारातील गणेशनगरला किरकोळ वादातून ५५ वर्षीय पुरुषाचा खून करण्यात आला. रविवारी (ता.१५) सकाळी साडेनऊला ही घटना घडली. (Isma murder in Varangaon due to dispute jalgaon crime news)

याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी अवघ्या एका तासात खुनातील संशयितास अटक केली. प्रमोद ज्ञानेश्‍वर महाजन (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी वसाहतमधील बसस्थानक परिसराला लागून आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दर्यापूर शिवारात गणेशनगर नावाची वस्ती आहे. नातेवाईक यांना भेटण्यासाठी आलेले प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय ५५) हे येथील एका चहा, नाष्ट्याच्या हॉटेलमध्ये थांबले.

यावेळी श्री. महाजन यांचा मित्र दीपक कृष्णकुमार सिंग त्यांना भेटला. दोघांनी हॉटेलमध्ये गप्पा मारत चहा घेतला. याचवेळी या दोघांमध्ये वाद सुरु झाला. याच वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दीपक सिंग याने प्रमोद महाजन याच्या डोक्यात लाकडी दांडके मारत निघून गेले.

लाकडी दांडक्याचा वर्मी मार लागल्याने प्रमोद महाजन हे जमिनीवर कोसळले घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. त्यांनी जखमी श्री. महाजन यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राजरत्न तायडे यांनी श्री. महाजन यांना तपासून मयत घोषित केले.

याप्रकरणी मनोहर ओंकार महाजन यांच्या तक्रारीवरून दीपक सिंग याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन संशयितास एका तासात अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT