136 crore spent on Padalsare project this year esakal
जळगाव

Jalgaon News : पाडळसरे प्रकल्पावर यंदा 136 कोटी खर्च; 13 वॉक वे ब्रीज बसविले

Jalgaon : तालुक्याची हरित क्रांती करणारा निम्न तापी प्रकल्पावर गेट ठेवण्यासाठी १३ वॉक वे ब्रिज ठेवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्याची हरित क्रांती करणारा निम्न तापी प्रकल्पावर गेट ठेवण्यासाठी १३ वॉक वे ब्रिज ठेवले आहे. आणखी चार ब्रिज ठेवण्यात येतील. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने धरणाचे काम बंद करण्यात आले आहे. निम्न तापी प्रकल्पाचे प्रस्तंभाचे काम २०२३ मध्ये दिवाळीनंतर सुरू झाले. दिवाळीपूर्वी १५ प्रस्तंभ सरासरी १४५ मीटरपर्यंत झाले होते. काम सुरू झाल्यावर १४५ ते १५१ मीटर तलांकापर्यंत झाले आहे. ( 136 crore spent on Padalse project this year )

एकूण २३ प्रस्तंभ असून, त्यापैकी २१ प्रस्तंभाचे संधानक काम झाले आहे. प्रस्तंभांची उंची सहा मीटरने वाढली आहे. नुकतीच प्रकल्पाला २८८८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या वर्षी प्रकल्पावर १३६ कोटी खर्च झाले आहेत. आतापर्यंत प्रकल्पावर ८७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेट ठेवण्यासाठी वॉक वे ब्रिजही त्यावर ठेवले आहेत. २३ वॉक वे ब्रिज ठेवण्यात येतील. आतापर्यंत १३ ब्रिज ठेवले आहेत. (latest marathi news)

सालाबादाप्रमाणे जून महिना लागल्याने नदीपात्रातील बांधकाम बंद केले आहे. ठेकेदाराने हळूहळू आपली यंत्र सामग्री बाहेर काढणे सुरू केले आहे. मात्र, पावसाला अजून वेळ असल्याने तोपर्यंत आणखी चार ब्रिज ठेवण्याचे ठेकेदाराचे नियोजन आहे. पुन्हा ऑक्टोबरमध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल. एकीकडे भूसंपादन आणि दुसरीकडे धरणाचे बांधकाम सुरू आहे. त्यादरम्यान विविध मान्यता व तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT