Gold Silver Rate esakal
जळगाव

Jalgaon Gold Silver Rate : सोन्यात 1800, तर चांदीत 3 हजारांची घट! मागणीत घट झाल्याचा परिणाम

Jalgaon News : सोन्याचा दर २० एप्रिलला ७६ हजार १४ रुपये होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold Silver Rate : आगामी काळात किमान दोन महिने तरी लग्नसराई नाही. दुसरीकडे सोने, चांदीच्या दर गगनाला पोचल्यामुळे सोने, चांदीच्या मागणीत काहीशी घट झाली आहे. परिणामी, सोन्याच्या दरात १८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांतील हा चढ उतार आहे. (Jalgaon Gold-Silver Rate news)

सोन्याचा दर २० एप्रिलला ७६ हजार १४ रुपये होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला होता. यामुळे सोने, चांदीचे दागिने विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले. गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर आली होती.

सोन्यातील दरवाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्म घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला होता. आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे सोने, चांदीचे दर घसरले आहेत.

मंगळवारी (ता. ३०) सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार १६० प्रतितोळा, तर चांदी जीएसटीसह ८३ हजार ४३० प्रतिकिलो आहे. दहा दिवसांपूर्वी सोन्याचे दर ७६ हजार १४ (प्रतितोळा), तर चांदी ८६ हजार ५२० (प्रतिकिलो) (जीएसटीसह) होते. सोन्यात १८०० तर चांदीत तीन हजार रुपयांची झालेली घटीने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)

५ मार्च-- ६४ हजार ३००-- ७३ हजार

२३ मार्च--६६ हजार २००--७५ हजार

२८ मार्च--६६ हजार ३००--७५ हजार

२९ मार्च--६८ हजार २००--७६ हजार

२ एप्रिल--६८ हजार ७००--७७ हजार

३ एप्रिल--६९ हजार ४००--७८ हजार

५ एप्रिल--७० हजार ६००--८१ हजार

८ एप्रिल--७१ हजार ८००--८३ हजार

९ एप्रिल--७१ हजार २००--८२ हजार

१२ एप्रिल--७३ हजार--८४ हजार

१८ एप्रिल--७३ हजार ३००--८४ हजार

२० एप्रिल--७३ हजार ८००--८४ हजार

२६ एप्रिल--७२ हजार ३००--८२ हजार

३० एप्रिल--७२ हजार--८१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT