Farmer Sagar Patil took out a procession of a vehicle loaded with bananas from the farm to Gulal Udhalat village. esakal
जळगाव

Jalgaon Banana News : केळीचे पावणेतीन एकरात 20 लाखांचे उत्पन्न! शहापूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा; गावापर्यंत काढली सवाद्य मिरवणूक

Latest Jalgaon News : चांगल्या, दर्जेदार केळीला चांगला भाव मिळाल्याने येथील सागर विजय पाटील या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात काढलेल्या केळीच्या घडाणे भरलेल्या वाहनाची मंगळवारी (ता. १) दुपारी थेट शेतापासून तर गावापर्यंत गुलाल उधळत सवाद्य काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

वासुदेव चव्हाण

शहापूर (ता. जामनेर) : तीस-पस्तीस वर्षांपूर्वी कोरडवाहू शेती अशी ओळख असलेल्या जामनेर तालुक्यात सिंचन प्रकल्पांमुळे काही वर्षांपासून केळीची लागवड वाढली आहे. त्यातच नवनवीन तंत्रज्ञानानुसार केळी लागवड होत असल्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे.

चांगल्या, दर्जेदार केळीला चांगला भाव मिळाल्याने येथील सागर विजय पाटील या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात काढलेल्या केळीच्या घडाणे भरलेल्या वाहनाची मंगळवारी (ता. १) दुपारी थेट शेतापासून तर गावापर्यंत गुलाल उधळत सवाद्य काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे. (20 lakhs income in three acres of banana)

श्री. पाटील हे दरवर्षी केळी लागवड करतात व त्या पिकाची योग्य निगा ठेवून चांगले दर्जेदार उत्पन्न काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यावर्षी त्यांनी पावणेतीन एकरात चार हजार तीनशे उती संवर्धित रोपे लावली होती. केळीचे दर्जेदार, उत्तम प्रतीचा माल असल्याने वीस लाख एक हजार रुपयात बाग विकली. यासाठी एका झाडाला एकसष्ठ रुपये खर्च याप्रमाणे दोन लाख साठ हजार रुपये खर्च आला आहे. (latest marathi news)

अनेकांकडून शेताला भेट

व्यापाऱ्याने मंगळवारी (ता. १) केळी काढल्याने श्री. पाटील यांनी त्या केळीच्या घडाने भरलेल्या वाहनाची गुलाल उधळत सवाद्य मिरवणूक काढली. केळीची बाग चांगली बहरल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या बागेला भेट देऊन पाहणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

IPL 2026 Auction: मुंबई, महाराष्ट्र अन् विदर्भाचे खेळाडूही मालामाल; राज्यातील 'या' १० खेळाडूंवर लागली बोली

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

SCROLL FOR NEXT