Chairman Ashok Patil, Deputy Chairman Suresh Patil, Director and farmers were present during the auction of agricultural produce esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर बाजार समितीत 20 हजार क्विंटल मालाची आवक

Jalgaon News : बाजार समितीत सोमवारी (ता. ८) २० हजार क्विंटल मालाची विक्रमी आवक झाल्याची माहिती सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : बाजार समितीत सोमवारी (ता. ८) २० हजार क्विंटल मालाची विक्रमी आवक झाल्याची माहिती सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी दिली. सकाळी सुमारे साडेपाचशे वाहनांची गर्दी झाली होती. वाहनांना रांगेत उभे करण्यासाठी १५ कर्मचारी नियुक्त केले होते. कडक उन्हाळा असल्याने वाहने उन्हात उभी होती. (Jalgaon 20 thousand quintals goods inflow in Amalner Market Committee)

मात्र सभापती अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना व वाहनचालकांना जागेवर थंड व शुद्ध पाणी पुरविण्यासाठी तीन कर्मचारी नियुक्त केले होते. लिलाव सुरळीत व्हावा व बाहेरील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, म्हणून सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक समाधान धनगर लिलावावेळी थांबून होते.

गव्हाची ४ हजार क्विंटल आवक झाली. गव्हाला कमाल भाव ३०११, बाजरीची १५०० क्विंटल आवक झाली. कमाल भाव २,४३५ रुपये, दादरची तीन हजार क्विंटल आवक झाली. (latest marathi news)

कमाल भाव ४२०० रुपये, ज्वारीची तीन हजार क्विंटल भाव २४३९ रुपये, मका ६ हजार क्विंटल भाव २१०० रुपये, व्ही टू चना १५०० क्विंटल आवक झाली. भाव ८१५५ रुपये होता. यासह गावठी हरभऱ्याला ५९००, गुलाबी हरभऱ्याला ८०७१ रुपये, चापा हरभऱ्याला भाव ५७११ रुपये, डॉलर हरभऱ्याला १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT