Police Transfers esakal
जळगाव

Police Transfer : जळगावात 24 नवे अधिकारी येणार; 30 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police Transfer : नाशिक परिक्षेत्रात कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Police Transfer : नाशिक परिक्षेत्रात कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले आहेत. यामध्ये ३० अधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यातून बदली झाली असून नवीन २४ अधिकारी जळगावात बदली होऊन येणार आहेत. या बदल्यांमध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्या व विनंती बदल्यांविषयी निर्णय घेत विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी (ता.२०) जुलै रोजी रात्री बदल्यांचे आदेश पारीत केले. (24 new officers will come and transfer of 30 police officers in jalgaon )

जळगाव जिल्ह्यांतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे तर अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दोन पोलिस निरीक्षक जाणार असून नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड जळगावात येत आहेत.

या सोबतच विनंती बदल्यांमध्ये जिल्ह्यात तीन नवीन सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. दोन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्यातून इतरत्र बदली झाली असून पाच नवीन उपनिरीक्षक येणार आहेत. जिल्‍ह्‍यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्यातून बदली झाली असून नवीन सात सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात उपनिरीक्षकांची बदली झाली असून तेवढेच अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.

बदली झालेले व येणारे सहाय्यक निरीक्षक (कंसात संध्याची नेमणूक) ः गणेश शिवाजी म्हस्के (नाशिक) जळगाव, योगिता मधुकर नारखेडे (नाशिक ग्रा) जळगाव, अमितकुमार प्रतापसिंग बागूल (नंदुरबार)जळगाव, अनिल लोटन वाघ आणि जयेश पिराजी पाटील (नाशिक ) जळगाव, रवींद्र नारायण पिंगळे, प्रमोद वाघ आणि नितीन नारायण रणदिवे, (अहमदनगर) जळगाव, संदीप अशोक हजारे (जळगाव) अहमदनगर, शीतलकुमार नाईक जळगावी मुदतवाढ, रवींद्र पांडुरंग बागूल(जळगाव) नंदुरबार, रूपाली संभाजी चव्हाण (जळगाव) नाशिक ग्रामीण, अनिल छबू मोरे व मीना तडवी आणि नीलेश गायकवाड(जळगाव) मुदतवाढ, उमेश बोरसे, दीपक बिरारी, अमोल मोरे, राहुल मोरे (जळगाव) नाशिक ग्रामीण, तुषार देवरे (जळगाव) धुळे, किशोर पवार, संदीप परदेशी, गणेश अहिरे, अमोल पवार आणि हरीश भोये (जळगाव) अहमदनगर, विनोदकुमार गोसावी (जळगाव) नंदुरबार, दिनेश भदाने (नंदुरबार) जळगावी बदली करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक) ः गणेश चौभे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विनोद मधुकर खांडबहाले(जळगाव) अहमदनगर, अमोल किशन गुंजाळ (जळगाव) नंदुरबार, संदीप श्रीराम चेडे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विजय रामसिंग वसावे (जळगाव) नंदुरबार, अविनाश लक्ष्मण दहिफळे (जळगाव) धुळे, गणेश मुरलीधर मुर्हे (जळगाव)नंदुरबार, माया नारायणसिंग राजपूत (नंदुरबार) जळगाव, राहुल शिवाजी सानप, मनोज जनार्दन महाजन आणि सोपान रमेश गोरे या तिघांची (अहमदनगर) जळगाव येथे बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

'खुर्ची'वरून राडा... एक पोस्ट, दोन अधिकारी... CMO कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

Latest Maharashtra News Live Updates: वि. के. वयम् मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT