dry fruits esakal
जळगाव

Jalgaon Dry Fruits : सुकामेव्याच्या दरांत 25 टक्क्यांनी वाढ! दिवाळीचे बजेट महागणार; काजू हजार ते पंधराशे रुपये प्रतिकिलो

Latest Jalgaon News : यंदा जगभरात बहुतांश सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बहुतांश सुकामेव्याच्या दरात यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Dry Fruits : विजयादशमीनंतर आता वेध लागले आहेत ते दिवाळीचे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोडधोड खाद्यपदार्थ बनविण्यासाठी सुकामेव्याचा जास्त वापर केला जातो. बाजारात सुकामेव्याला दिवाळीत मागणी अधिक असते. यंदा जगभरात बहुतांश सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बहुतांश सुकामेव्याच्या दरात यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (25 percent increase in dry fruits prices on Diwali)

बदाम, काजू, जर्दाळू, अक्रोड, मनुका याच्या भावात वाढ झाली आहे. मागील वर्षी काजू ५५० ते ८०० रूपये प्रतिकिलो भाव होता. यंदा मात्र काजू १ हजार ते १५०० रुपये प्रति किलो दर झाला आहे. यंदा सुकामेव्याचे दर वाढल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने लाडूमधील काजू, बदाम गायब झाल्याचे दिसत आहे. दिवाळीत सुकामेवा हा टिकाऊपणा असल्याने मागणी अधिक असते. यंदा मात्र प्रामुख्याने ड्रायफ्रूटसच्या किमती चांगल्या वधारल्याने दिवाळी यंदा महाग होण्याची चिन्हे आहेत.

भाव वाढण्याची ही आहेत कारणे

इराण-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम. परदेशातील सुकामेव्याच्या किमतीत वाढ. आफ्रिका, ब्राझील या देशातून येणारा काजू, अंजीर, बदाम, खजूर, बेदाणा दरात वाढ . अती पावसामुळे यंदा देशातील उत्पादन घटले असल्याने यंदा आवक कमी. त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या सुकामेव्यावर झाला आहे.

काजूचे दर एक हजारांवर

गत वर्षी दिवाळीत काजू ५५० ते ८०० रूपये प्रतिकिलो दराने मिळत होता. तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र यंदा काजूचे दर १ हजाराचा टप्पा पार करत ९०० ते १५०० रूपयांवर पोहचला आहे. यामुळे काजू यंदा फराळाच्या पदार्थातून गायब होणार असल्याचे दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे यंदा मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर दिवाळी गेली आहे. (latest marathi news)

प्रकार --मागील वर्षीचे दर - यंदाचे दर

बदाम--६०० ते ९००-- ९०० ते १०००

काजू--५५० ते ८००--९०० ते १५००

आक्रोड-- ६०० ते ८००--७०० ते ८००

खारा पिस्ता--७०० ते १०००--९०० ते १५००

अंजीर--७०० ते १२००----१००० ते १५००

जर्दाळू--३०० ते ५००-- ४०० ते १०००

काळी मनूका--३०० ते ४००-- ५०० ते ६००

खजूर-- २०० ते १५००

"यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सुकामेवा (ड्रायफ्रूटस) महाग झाला आहे. आवक कमी झाल्याने यंदा काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, पिस्ता भावात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. शार्टटेड असल्याने काही ड्रायफुटची आवक कमी झाली असून दरवाढ झाली आहे."

- कीर्ती बरडिया, ड्रायफ्रूटसचे व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT