Jalgaon 28 crore fund for 54 dams in Pachora Bhadgaon taluka MLA Kishor Patil efforts
Jalgaon 28 crore fund for 54 dams in Pachora Bhadgaon taluka MLA Kishor Patil efforts sakal
जळगाव

जळगाव : पाचोरा, भडगाव तालुक्यात ५४ बंधारे

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : पाचोरा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध गावांत ५४ सिमेंट बंधाऱ्यांसह २८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, यामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होऊन पाचोरा व भडगाव तालुका सुजलाम् सुफलाम् होणार असल्याचा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील यांनी शिवालय आपल्या संपर्क कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली व त्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांसंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले, की पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे २८ कोटी रुपयांच्या ५४ ठिकाणच्या सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून, यामुळे दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे.

शासनाचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. यात कासमपुरा, टाकळी, भोरटेक खुर्द, बांबरुड महादेवाचे, सारोळा, निंभोरी, नालबंदी, बाळद बुद्रुक, पिंपळगाव हरेश्‍वर, म्हसास, सावखेडा खुर्द, वरसाडे, पिंपळगाव तांडा, वाडी बांबरुड खुर्द, लोहारी खुर्द, खडकदेवळा, शेवाळे, वाडी, नाचणखेडा, आसनखेडा, तारखेडा, लासगाव, बांबरुड राणीचे, शेवाळे, गाळण खुर्द, आसनखेडा, कोळगाव, पथराड, वडजी, खाजोळा, वाघुलखेडा, सारोळा या गावांचा समावेश असून, आणखीही काही गावांत सिमेंट बंधारे करण्यासंदर्भात नियोजन आहे.

परंतु काही ठिकाणी जागेची अडचण असल्याने जागेचा प्रश्न सोडवून नियोजनबद्धरीत्या सिमेंट बंधारे तयार करून शंभर टक्के हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. राजेश पाटील यांनी आभार मानले.

मतदारसंघातील शेती, सिंचन, दळणवळण, व्यापार, उद्योग हे आपले प्राधान्याचे विषय असून, त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरू असून, शेवटच्या घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.

- किशोर पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT