surgery esakal
जळगाव

Jalgaon News : तरुणाच्या पोटातून काढली 4 किलोची गाठ! GMCत यशस्वी शस्त्रक्रिया; पथकाकडून कर्करोगग्रस्ताला जीवदान

Latest Jalgaon News : गेल्या दीड वर्षांपासून गाठीमुळे वाढलेली ‘प्लिहा’ काढून टाकत कर्करोग्रस्ताला जीवदान देण्यात यश मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पहूर (ता. जामनेर) येथील एका ३५ वर्षीय तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) जोखमीची शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या दीड वर्षांपासून गाठीमुळे वाढलेली ‘प्लिहा’ काढून टाकत कर्करोग्रस्ताला जीवदान देण्यात यश मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी शल्यचिकित्सा विभागाचे कौतुक केले आहे. (4 kg tumor removed from young man stomach in jalgaon GMC)

पहूर येथील संजय सुरेश पांढरे यांना गेल्या दीड वर्षांपासून पोटात प्लिहाचा आकार वाढत चालला असल्यामुळे त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर समजले, की त्यांना रक्ताचा कर्करोग आहे. त्यामुळे त्याचा आकार आणखी वाढत जात होता. त्यांनी केमोथेरपी घेतली.

पण आराम पडला नाही. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. या ठिकाणी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी विविध तपासण्या केल्या. त्यानंतर संजय पांढरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल ४ किलोची प्लिहाची गाठ काढून संजय पांढरे यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले. प्लिहावर शस्त्रक्रिया शक्य नसताना देखील आपले वैद्यकीय कौशल्य वापरून डॉक्टरांनी रुग्णाला वाचविण्यात यश मिळवले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे. (latest marathi news)

ही शस्त्रक्रिया सहयोगी प्रा.डॉ. रोहन पाटील, सहाय्यक प्रा. डॉ. ईश्वरी भोंबे, वरिष्ठ निवासी डॉ. हर्षा चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. जिया उल हक, डॉ. झैद पठाण, डॉ. अमेय नेहेते, डॉ. पूजा जयस्वाल यांच्या पथकाने केली. त्यांना शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी मार्गदर्शन केले.

"खासगी दवाखान्यात भरपूर पैसे लागणार होते. तरीदेखील खासगी डॉक्टरांनी जीवाची कुठलीच हमी दिली नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रिया गेल्या दीड वर्षांपासून टाळत होतो. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोफत आणि उत्तम शस्त्रक्रिया झाल्याने दिलासा मिळाला."- संजय पांढरे, रुग्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT