Silver And Gold Rate  esakal
जळगाव

Jalgaon Gold Silver Rate : चांदीत 4 हजारांची तर सोन्यात 1800 घसरण; सोने, चांदीच्या दरात होतेय घट

Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात आज चांदीच्या दरात तब्बल चार हजारांची, तर सोन्याच्या दरात १८०० रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात आज चांदीच्या दरात तब्बल चार हजारांची, तर सोन्याच्या दरात १८०० रुपयांची घसरण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोने, चांदीच्या दर कमी होत आहे. सोबतच लग्नसराई नसल्याने सोने, चांदीला सध्या मागणी फारशी नाही. निवडणुकीपूर्वी सोने, चांदीचा बाजार तेजीत होता. आज सोने ’जीएसटीसह’ प्रती दहा ग्रॅम ७३ हजार ३३६ होते तर चांदी प्रती किलो ९१ हजार ६७० रुपये होती. (4 thousand in silver and 1800 in gold rate fall )

२२ मेस चांदीच्या भावात तीन हजारांची वाढ झाली होती. तेव्हा चांदी प्रतिकिलो लाखावर जाते की काय? याबाबत विविध अंदाज वर्तविले गेले. चांदीचा बुधवारी भाव प्रतिकिलो ९५ हजार ७९० रुपये जीएसटीसह होता, तर सोने ७६ हजार २२० (जीएसटीसह) प्रति दहा ग्रॅम होते.लग्नसराई नसताना सोने, चांदीच्या भावात झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे.

गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता. चांदीच्या भावातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर आली होती. सोन्यातील दरवाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला होता. आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळे सोने, चांदीचे दर सात दिवसांपूर्वी घसरले होते. आता सातत्याने चांदीच्या दरात वाढ होत होती.

लोकसभा निवडणुकीनंतर मात्र सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. काल सोने ७५ हजार १९० (जीएसटीसह) प्रती दहा ग्रॅम तर चांदी ९५ हजार ७९० (जीएसटीसह) होती. आज चांदीत चार हजारांची घसरण तर सोन्यात १८०० रुपयांची घसरण होऊन सोने प्रती दहा ग्रॅम ७३ हजार ३३६ तर चांदी ९१ हजार ६७० वर पोचली आहे. (latest marathi news)

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रति तोळा)-- चांदी (प्रतिकिलो)

*४ मे-- ७१ हजार २००--८१ हजार

*७ मे--७१ हजार ६५०--८३ हजार

*१८ मे--७४ हजार--९१ हजार

*२२ मे--७४ हजार--९३ हजार

१ जून-- ७१ हजार ६००--९० हजार

५ जून-- ७२ हजार २००--९० हजार

८ जून-- ७३ हजार--९३ हजार

९ जून--७१ हजार २००--८९ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT